धामणी तालुक्यातील युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:12 IST2021-05-27T04:12:29+5:302021-05-27T04:12:29+5:30

याबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणी येथील सचिन राजाराम जाधव (वय ४२) हे काल रात्री सात ...

Brutal murder of a youth in Dhamni taluka | धामणी तालुक्यातील युवकाचा निर्घृण खून

धामणी तालुक्यातील युवकाचा निर्घृण खून

याबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणी येथील सचिन राजाराम जाधव (वय ४२) हे काल रात्री सात वाजल्यापासून पासून घरी परतले नसल्याबाबत त्यांचा पुतण्या रोहन जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आज सकाळी पोंदेवाडी काठापूर रस्त्यालगत एका ठिकाणी रक्ताचे शिंतोडे व चपलांचा जोड व कंगवा या परिसरातील नागरिकांना आढळून आला. त्यामुळे सचिन जाधव यांचा घातपात झाला असल्याची शंका सरपंच अनिल वाळूंज यांनी उपस्थित केली.

सचिन जाधव हे गृहमंत्री वळसे-पाटील यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी निवडणूकही लढविली होती. त्यामुळे राजकीय वैमनस्यातूनही त्यांचा खून झाली की आर्थिक देवाणघेवाणीतून झाला याबाबत तर्क-वितर्क होत होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी भेट दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्वतः पाहणी करून माहिती घेतली व पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या.

पोंदेवाडी फाट्यावर, काठापूर रस्त्यावर असणाऱ्या परिसरात सचिन जाधव यांचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करून त्यांची गाडी मृतदेह जाळून विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला. याबाबत मंचर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी तपास करत अवघ्या पाच ते सहा तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Brutal murder of a youth in Dhamni taluka