पूर्ववैमनस्यातून एकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:41+5:302021-02-05T05:09:41+5:30
अमोल उर्फ पप्प्या विष्णू जाधव, कालिदास उर्फ सागर मल्हारी जाधव, अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव ( सर्व रा.गायदरा वडकी ...

पूर्ववैमनस्यातून एकाचा निर्घृण खून
अमोल उर्फ पप्प्या विष्णू जाधव, कालिदास उर्फ सागर मल्हारी जाधव, अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव ( सर्व रा.गायदरा वडकी ता.हवेली ) व एक अनोळखी इसम ( नाव-पत्ता माहीत नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुषार आणि अमोल जाधव यांचे कुटुंबामध्ये वर्षभरापूर्वी वाद झाला होता. त्यातून तुषार याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुभम पवार याच्या स्नॅक सेंटरच्या गाड्यावर तुषारचे नेहमीच येणे जाणे असते. बुधवारीही तो नेहमीप्रमाणे शुभच्या सेटरवर आला होता. दोघे चहा पित असताना गायदरा बाजूने दोन दुचाकीवरून अमोल जाधव, अमित जाधव, सागर जाधव व एक अनोळखी इसम असे हातात लोखंडी रॉड कोयते व चाकू घेऊन आले. त्यातील एकाने शुभमला चाकूचा धाक दाखवत तेथे थांबवले. अन्य तिघांनी धारदा शस्त्रांनी तुषारवर वार केले. यामध्ये तुषारचा मृत्यू झाला.