शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीएस मार्ग : निगडी ते दापोडीदरम्यानची कामे अपूर्णावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:31 IST

मेट्रोच्या कामामुळे बीआरटीएसला अडथळ्यांची शर्यत आहे.

पिंपरी : दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. मेट्रोच्या कामामुळे बीआरटीएसला अडथळ्यांची शर्यत आहे. ‘लोकमत’ने पाहणी केली असता ही बाब समोर आली.दापोडी ते निगडी बीआरटीची स्थिती पाहणी करण्यात आली आहे़ दापोडी येथील बीआरटी बसथांब्याच्या छताची दुरवस्था झाली आहे. फुगेवाडी येथे बीआरटी बसथांब्याच्या बाजूलाच सहा मोठे खड्डे आहेत. त्यानंतर कासारवाडी येथे महामेट्रोचे काम सुरू आहे. ते काम बीआरटीच्या मार्गावरच सुरू आहे. बीआरटी मार्गावर लोखंडी सळया, सिमेंट, वाळू, काळी माती, मुरूम पडून आहे. या ठिकाणी रस्त्याची खोदाई सुरू आहे.कासारवाडी येथील बीआरटीचा बसथांबासुद्धा वापरात येऊ शकत नाही. एच. ए. कंपनीजवळ बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. त्यामुळे तो मार्गदेखील बंद आहे. मोरवाडी ते आकुर्डीपर्यंत कर्मचारी बीआरटी मार्गाचे काम करत आहेत. आकुर्डी येथील बीआरटी मार्गावरील एका बसथांब्याचे काम अपूर्ण आहे. आकुर्डीच्या पुढे बीआरटी मार्गाचे काम सुरू आहे.एम्पायर इस्टेट येथे बसथांब्याची समोरील बाजू तुटलेली आहे. महापालिकेच्या समोर मेट्रोचे काम सुरू आहे. तेथे माती, लोखंडी गज, मुरूम, सिमेंट आदी साहित्य पडून आहे. त्यामुळे या मार्गाचाही वापर करता येणार नाही. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दापोडीकडे जाताना मेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे.फुगेवाडी येथे बीआरटी मार्गावर पाणी साचलेले आहे. तेथे मोठा खड्डा आहे. सीएमई येथे बॅरिकेडस वाकलेले आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गात अपघात होण्याची शक्यता आहे. दापोडीपर्यंत महामेट्रोचे काम सुरू आहे. बीआरटी मार्गाची स्थिती गंभीर आहे. जागोजागी महामेट्रोचे काम सुरू आहे. बीआरटी मार्ग बंदच असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीची गरज आहे.

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूक