शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बीआरटीचा पहिल्याच दिवशी गोंधळ, दहा वर्षांनंतर धावलेल्या बसला अडथळ्यांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:09 IST

मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावर १० वर्षांनी आज शुक्रवारी ‘पीएमपी’ची बस धावली. निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनलचेही उद्घाटन करण्यात आले. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखविला. मात्र, पहिला दिवस प्रवाशांचा गोंधळात गेला. मार्गात अनेक ठिकाणी महामेट्रोची खोदाई व रखडलेल्या कामांचा अडथळे पार करीत बस धावली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनलमध्ये झालेल्या कार्यक्रमास सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.

मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने आयआयटी पवईच्या मदतीने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करून याचिकाकर्त्यां सोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यानंतर न्यायालयाने बीआरटीएस बस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखविला. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बीआरटी प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या मार्गावर २७३ बस धावणार आहेत. एका दिवसाला २२०० फेऱ्या होतील. एका मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अपर इंदिरानगर, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. दापोडी ते निगडी मार्ग अनेक ठिकाणी खुला आहे. त्यामुळे खासगी वाहने सहजपणे या मार्गात घुसत आहे. हा मार्ग केवळ पीएमपी बससाठी असतानाही शुक्रवारी खासगी वाहनांची घुसखोरी झाली. मात्र, या ठिकाणी कोणतेही सूचना फलक नसल्याने खासगी वाहनांची फसगत होत आहे.प्रवाशांची उडाली तारांबळया मार्गावर काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला होता. भोसरी-आळंदी ते चिंचवड, वाकड, हिंजवडी आणि पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, किवळे, रावेत परिसरात जाणाºया प्रवाशांची तारांबळ उडाली होती. डेडीकेटेड लेनमध्ये चिंचवड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रवासी नेहमीप्रमाणे बसथांब्यावर होते. नवीन बस थांबा माहीत नसल्याने कोणत्या बसथांब्यावर थांबायचे याबाबत गोंधळ उडत होता. तर अंतर्गत प्रवास करणारे नागरिकांचाही गोंधळ उडत होता.खासगी वाहनांना दंड४पीएमपीच्या ११३ गाड्या, तर भाडेतत्त्वावरील १३९ गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील २१ गाड्या अशा एकूण २७३ गाड्या या मार्गावर धावतील. बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, इतर वाहनांना बंदी आहे. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे.

टॅग्स :Pune BRTपुणे बीआरटीPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी