शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी समितीचे कामही संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:21 IST

सातत्याने वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देसदस्यांची नाराजी : पाच महिन्यांत केवळ तीन बैठकाबीआरटी मार्गांतील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सुचना देण्याची जबाबदारी या समितीवर मागील काही वर्षांपासून शहरातील बहुतेक बीआरटी मार्ग अपूर्णावस्थेत बीआरटी मार्गांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याची गरज

पुणे : शहरातील विविध बीआरटी मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीआरटी देखभाल-दुरूस्ती समितीचे कामही धीम्यागतीने सुरू आहे. शहरातील बहुतेक बीआरटी मार्ग अपूर्णावस्थेत असून मागील काही वर्षांपासून केवळ डागडुजी केली जात आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी नेमण्यात आलेली समितीच या वाटेने जात असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील स्वारगेट-कात्रज हा पहिला पथदर्शी बीआरटी मार्ग अनेक वर्षांनंतरही बाल्यावस्थेतच आहे. सध्या या मार्गाच्या नुतनीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. शहरातील नगर रस्ता, संगमवाडी रस्ता, सोलापुर रस्त्यावरील बीआरटी मार्गही अर्धवट आहेत. काही मार्गांची दुरावस्था झाली असून प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सातत्याने वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीची स्थापना करून पाच महिने उलटले आहेत. बीआरटी मार्गांची पाहणी करून त्यातील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सुचना देण्याची जबाबदारी या समितीवर आहे.पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये पालिकेच्या पथविभातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पीएमपीतील काही अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीची स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच नगर रस्त्यावरील बीआरटीची पाहणी करण्यात आली. तर आतापर्यंत पाच महिन्यांत तीन बैठका झाल्या आहेत. या समितीची बैठक नुकतीच पार पडली यावेळी समितीने केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याचा मुद्दा समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. सुचनांचा गांभीर्याने विचार न करता केवळ डागडुजी करून कामे पुढे ढकलली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. प्रशासन बीआरटी समिती बाबत उदासीन असून अशी बुजगावणे बनलेली समितीच नको, अशा शब्दांत समितीचे सदस्य आणि  पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी नाराजी व्यक्त केली. ---------बैठकीला पालिका आयुक्तही हवेतबीआरटी मार्गांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याची गरज आहे. या अहवालामध्ये प्रत्येक मार्गावर असलेल्या त्रुटी व त्यावरील उपाययोजना, त्याचा कालावधी याचा समावेश असायला हवा. तसेच पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत समितीची बैठक व्हायला हवी. सुचनांचा विचारच होत नसेल तर समितीचा काहीही उपयोग होणार नाही.जुगल राठी, समितीचे सदस्य

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलkunal kumarकुणाल कुमारPune BRTपुणे बीआरटी