आळंदी रस्त्यावर ‘बीआरटी बंद’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 02:29 IST2015-08-21T02:29:44+5:302015-08-21T02:29:44+5:30
अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंच, अखिल भारतीय छावा संघटना, लष्कर-ए-भीमा, बहुजन समाज पार्टी, भीमटोला संघटना, मराठी साम्राज्य

आळंदी रस्त्यावर ‘बीआरटी बंद’ आंदोलन
येरवडा : अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंच, अखिल भारतीय छावा संघटना, लष्कर-ए-भीमा, बहुजन समाज पार्टी, भीमटोला संघटना, मराठी साम्राज्य सेना यांसह विश्रांतवाडीतील रिक्षा संघटनांबरोबर सामाजिक मंडळांच्या वतीने विश्रांतवाडी ते संगमवाडीदरम्यान सुरू झालेल्या बीआरटीविरोधात आळंदी रस्त्यावर ‘बीआरटी बंद’ आंदोलन करण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचाचे जिल्हाध्यक्ष संतोष जगताप, संपादक दिलीप ओरपे, लष्कर-ए भीमा संघटनेचे अध्यक्ष सचिन धिवार, राष्ट्रवादीचे विनोद पवार, बसपाचे जितेंद्र कराळेकर, राजू बेंगळे, प्रशांत डोळस, भीमटोला संघटनेचे सचिन शिंंदे, छावा संघटनेचे धनंजय जाधव, मराठी साम्राज्य सेनेचे अविनाश संकुडे, कुंदन लष्करे, रहीम कवठेकर, गणेश धिवार, अमोल भोसले, इलायीस सय्यद, आरिफ पठाण, फिरोज शेख, यासीन शेख, शब्बीर शेख, मोबीन शेख, रियाज पठाण, यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्रांतवाडी ते संगमवाडी सुरू करण्यात आलेल्या बीआरटीमुळे वाहतूककोंडीबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर पालिकेने योग्य उपाययोजना कराव्यात; अन्यथा बीआरटी बंद करावी, या मागणीसाठी विश्रांतवाडी परिसरातील अनेक संघटनांनी हे आंदोलन केले. (वार्ताहर)