शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा

By नितीश गोवंडे | Updated: December 4, 2023 13:03 IST

याप्रकरणी १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पुणे : भावाच्या मित्राने अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी फोन करून, तुला सुखात ठेवीन असे सांगत प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर प्रकरण इतके पुढे गेले की आरोपीने १६ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. ती चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ वर्षीय पीडितेने रविवारी (दि. ३) पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ दीपक जाधव (रा. कात्रजगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आरोपी गणेश जाधव याच्या घरी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाचा मित्र आहे. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिला वेळोवेळी फोन करत, तुला सुखात ठेवीन असे सांगून मुलीला स्वत:च्या घरी बोलवून घेतले. यानंतर आरोपीने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांसमोर उघडकीस झाला. यानंतर कुटुंबियांनी पीडितेला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी लगेचच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोगरे या करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंग