घरफोडी करणाऱ्या भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST2021-06-25T04:09:45+5:302021-06-25T04:09:45+5:30
राकेशकुमार सरोज (वय ३०) आणि राजेशकुमार सरोज (वय ३३, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी ...

घरफोडी करणाऱ्या भावांना अटक
राकेशकुमार सरोज (वय ३०) आणि राजेशकुमार सरोज (वय ३३, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची ही घटना १९ व २० जुलै २०१९ रोजी विमाननगर परिसरात घडली होती.
फिर्यादी यांचे घर बंद असताना आरोपींनी दरवाजा उचकटून आत शिरले. त्यांनी बेडरूममधील रोख रक्कम, सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने व दोन रोलेक्स कंपनीची घड्याळे असा एकूण ३५ लाख ४८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
या दोघांनी निवृत्त पोलीस महासंचालकांच्या घरी घरफोडी केली होती. कोंढवा पोलिसांनी त्यांना हरियाना येथून पकडून आणले होते.