शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune News | आंबळेतील खुनी हल्यात भावजयीचा मृत्यू भावाची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 14:05 IST

आरोपी सावत्रभावाचाही आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात तोही गंभीर जखमी झाला आहे...

न्हावरे (पुणे) : आंबळे ( ता. शिरूर ) गावाच्या शिवारातील आंब्याचा मळा येथे सावत्रभावाने डंबेल व चाकूने केलेल्या खुनी हल्ल्यात भावजयीचा मृत्यू झाला. तर भावाची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करून घटनास्थळावरुन दुचाकीवरून पलायन करणाऱ्या आरोपी सावत्रभावाचाही आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात तोही गंभीर जखमी झाला आहे.

आंबळे येथे सावत्रभावाने केलेल्या खुनी हल्ल्यात भावजय प्रियंका सुनील बेंद्रे (वय २५ ) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती व आरोपीचा सावत्रभाऊ सुनील बाळासाहेब बेंद्रे यांची प्रकृती गंभीर आहे. तर घटनास्थळावरुन दुचाकीवरून पलायन करणारा आरोपी सावत्रभाऊ अनील बाळासाहेब बेंद्रे याचा आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात त्यालाही गंभीर दुखापत झाल्याने तोही अत्यवस्थेत आहे.

आंबळे गावाच्या शिवारातील आंब्याचा मळा येथे सुनील बाळासाहेब बेंद्रे व प्रियंका सुनील बेंद्रे हे राहत्या घरात झोपलेले असताना आज ( दि.२५ ) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे याने सावत्र भाऊ सुनील बेंद्रे व भावजय प्रियंका बेंद्रे यांना व्यायामासाठीच्या डंबेलने मारहाण व चाकूने वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या खुनी हल्यात सुनील बेंद्रे व प्रियंका बेंद्रे यांच्या डोक्याला व पोटात गंभीर दुखापत झाली. हे कृत्य करून आरोपी अनिल बेंद्रे याने आपल्या दुचाकीवरून घटनास्थळावरुन पलायन केले दरम्यान आंबळे येथे शिरूर-न्हावरे रस्त्यावर त्याने समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीला जोरदार धडक दिल्याने तोही त्यात गंभीररित्या जखमी झाला.

मयत प्रियंका बेंद्रे व त्यांचे पती सुनील बेंद्रे दोघेही आयटी इंजिनिअर असून ते पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरीस होते. आठ दिवसानंतर ते लंडन येथे नोकरीसाठी जाणार होते. त्यामुळे ते दोघे आंबळे येथे आपल्या मूळगावी आले होते. दरम्यान सावत्रभावाने केलेल्या हल्ल्यामुळे दोघांचेही स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेत प्रियंकाचा जीव गेल्याने व सुनीलची प्रकृती चिंताजनक असल्याने या घटनेबाबत परिसरातील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस उपअधिक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सहाय्यक फौजदार गोपीचंद चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची सुत्रे वेगाने हलवली आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी