शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून सख्या भावाचा चाकूने वार करून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:48 IST

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील घटना

सांगवी (बारामती): व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून राहत्या घरात लहान भावाने थोरल्या भावाचा चाकूने मानेवर छातीवर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. 

पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पेश अरुन धुळप (वय 26) वर्ष रा.तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, बु(ता. बारामती जि.पुणे), असे खून झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे. तर खून केल्या प्रकरणी आरोपी मंथन अरुण धुळप (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत फिर्यादी आई सुरेखा अरुण धुळप, (वय ५०) व्यवसाय गृहीणी, रा.तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, माळेगाव बु (ता. बारामती जि. पुणे), यांनी आरोपी मंथन अरुण धुळप (वय २३),तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलणी, माळेगाव बु (ता. बारामती जि.पुणे ) याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी (दि.२८) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मोठा भाऊ कल्पेश याला आठ दिवसापुर्वी चप्पलच्या व्यवसायाकरीता १ लाख ४० हजार रुपये भांडवल दिले होते. त्यानंतर आठ दिवसांनंतर दिलेल्या भांडवलाचे काय केले असा जाब लहान भाऊ मंथनने मोठा भाऊ कल्पेशला विचारला होता. यावर कल्पेशने सदरचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगून आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत मी नंतर पैसे देतो असे म्हटले. यानंतर अरोपी मंथन रागावून कल्पेशच्या अंगावर धावून गेला. यावेळी कल्पेश व मंथनच्यात मारहाण झाली. कल्पेशने हाताने बुक्याने छातीवर मारहाण  केली. यावेळी आरोपी मंथनने  रागातून घरातील कपाटातील चाकुने कल्पेशच्या मानेवर व छातीवर चाकुने जबर वार करुन त्याचा जागीच खून केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी मंथन यास वैद्यकीय तपासणी नंतर उपकारागृहात ठेवण्यात आले आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे