शेतातून वाट मागितल्याने भाऊ व पुतणीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST2021-03-27T04:11:36+5:302021-03-27T04:11:36+5:30

याप्रकरणी भानुदास प्रल्हाद जांबरे (वय ५४, रा. होळकरवाडी, जांबरेवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम प्रल्हाद जांबरे, विनोद राजाराम ...

Brother and nephew beaten for begging from the field | शेतातून वाट मागितल्याने भाऊ व पुतणीस मारहाण

शेतातून वाट मागितल्याने भाऊ व पुतणीस मारहाण

याप्रकरणी भानुदास प्रल्हाद जांबरे (वय ५४, रा. होळकरवाडी, जांबरेवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम प्रल्हाद जांबरे, विनोद राजाराम जांबरे व त्यांचे दोन साथीदार यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भानुदास व त्यांचे सख्खे भाऊ राजाराम यांचे कुटुंबाची होळकरवाडी गावचे हद्दीत २ एकर जमीन आहे. अद्यापपर्यंत वाटणी न झाल्याने ती पूर्वीपासून भानुदास कसत आहेत. काही दिवसांपूर्वी राजाराम याने त्यास जाण्यासाठी शेतातून वाट मागितली. त्यावेळी भानुदास यांनी त्यास शेताचे बाजूने वाट घेण्यास सांगितले. त्या वेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

त्यानंतर सुमारे ८ दिवसांपूर्वी राजाराम जांबरे यांचा मुलगा विनोद व इतर दोन मुले यांनी भानुदास यांच्या भाडेकरूंना दारु पिऊन येऊन शिवीगाळ केली होती. गुरुवारी (दि. २५) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास भानुदास व मुलगी एेश्वर्या शेतात असताना तेथे राजाराम याचा लहान मुलगा

विनोद व त्याचे बरोबर दोन अनोळखी इसम आले व त्यांचे क्षेत्रात जाण्यासाठी रस्ता मागू लागले.त्यावेळी भानुदास यांनी त्यांना समजावून तुम्ही शेताचे बाजुने रोड घ्या असे म्हणाले असता विनोद याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यावेळी त्यास समजावून सांगत असताना भाऊ राजाराम याने शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन विनोद याने तेथे लाकडी दांडके घेऊन भानुदास यांचे डोक्यात मारले. याचवेळी राजाराम व इतर दोघांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी वडिलांना सोडविण्यासाठी मुलगी एेश्वर्या आली असता तिलाही राजाराम याने हाताने मारहाण करुन ढकलून दिले. त्यानंतर भानुदास यांचे डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून ते सर्वजण तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी उपचार घेतले व उरूळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Brother and nephew beaten for begging from the field