वेश्याव्यवसाय दलालास सक्तमजुरी
By Admin | Updated: November 15, 2016 03:52 IST2016-11-15T03:52:32+5:302016-11-15T03:52:32+5:30
परराज्यातील मुलींना पुण्यात आणून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी एका एजंटला

वेश्याव्यवसाय दलालास सक्तमजुरी
पुणे : परराज्यातील मुलींना पुण्यात आणून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी एका एजंटला ३ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दीपक हिरा वराली (वय २०, रा. सोनवणेवस्ती, चिखलीगाव) असे त्याचे नाव आहे़ येरवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात यांना वराली हा परराज्यांतील मुलींना कंत्राट पद्धतीने बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने नगर रोड येथील एका लॉजमध्ये १० जून २०१६ रोजी सापळा रचला़ बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली़ त्यात घटनास्थळी दोन महिला आढळून आल्या होत्या़
या खटल्यात सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले़ अनैतिक व्यापार प्रतिबंध कलम ५ नुसार वरालीला ३ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम ४ नुसार एक वर्ष सक्तमुजरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली़ विशेष म्हणजे या खटल्याचा निकाल ३ महिने आणि ६ दिवसांत लागला आहे़