ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला; चाैघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST2021-07-14T04:15:02+5:302021-07-14T04:15:02+5:30

पुणे : ज्वेलरी शॉपची भिंत फोडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप चोरल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मूळचे नेपाळी असलेल्या चार ...

Broke the wall of a jeweller's shop and stole Rs 3.5 lakh; Chaigha arrested | ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला; चाैघांना अटक

ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला; चाैघांना अटक

पुणे : ज्वेलरी शॉपची भिंत फोडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप चोरल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मूळचे नेपाळी असलेल्या चार जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

गणेश विष्णू शाही (वय ३३), खगेंद्र दोदी कामी (वय २७), प्रेम रामसिंग टमाटा (वय ४२), जगत शाही (वय २८, सर्व रा. नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. १७ ते १८ जून रोजी सायंकाळी ७.३० ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

फिर्यादी हे त्यांचे ज्वेलरीचे दुकान बंद करून गेल्यानंतर दुस-या दिवशी त्यांच्या भावाने दुकान उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दुकानातील ३ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप चोरून नेल्याचे लक्षात आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपासासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

Web Title: Broke the wall of a jeweller's shop and stole Rs 3.5 lakh; Chaigha arrested