दाम्पत्याला भररस्त्यात मारहाण

By Admin | Updated: April 27, 2017 04:49 IST2017-04-27T04:49:18+5:302017-04-27T04:49:18+5:30

रस्त्यावर उभा राहिल्याच्या कारणावरून जातिवाचक उल्लेख करून, शिवीगाळ करत पती-पत्नीस मारणाऱ्या व्यक्तीसह अनोळखी

Bringing up the couple | दाम्पत्याला भररस्त्यात मारहाण

दाम्पत्याला भररस्त्यात मारहाण

इंदापूर : रस्त्यावर उभा राहिल्याच्या कारणावरून जातिवाचक उल्लेख करून, शिवीगाळ करत पती-पत्नीस मारणाऱ्या व्यक्तीसह अनोळखी पाच जणांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास काटी येथे ही घटना घडली.
वसंत सोलनकर असे आरोपीचे नाव आहे. अनिल मोहिते (वय ३९, रा. रेडा) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हा रस्त्यावर थांबला होता. गाडीमधून आलेल्या आरोपींनी जातिवाचक उल्लेख करत रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय, असे म्हणत गजाने मारण्यास सुरुवात केली.

Web Title: Bringing up the couple