पुरोगामित्वाची आण; देऊया ‘ती’ला मान

By Admin | Updated: September 7, 2016 01:41 IST2016-09-07T01:41:12+5:302016-09-07T01:41:12+5:30

परंपरेला छेद देऊन लोकमत सखी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’च्या गणेशोत्सवाचा दुसरा दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Bring progress Give it to 'Tea' | पुरोगामित्वाची आण; देऊया ‘ती’ला मान

पुरोगामित्वाची आण; देऊया ‘ती’ला मान

पुणे : परंपरेला छेद देऊन लोकमत सखी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’च्या गणेशोत्सवाचा दुसरा दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुरोगामित्वाचे पाऊल टाकणाऱ्या लोकमतच्या ‘ती’च्या गणेशाची अनेक मान्यवर महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान शहरातील विविध मंडळांनी महिलांच्या हस्ते आरती केल्यास त्याचे छायाचित्र लोकमतकडे पाठवून देण्याचे आवाहन ‘ती’चा गणपतीतर्फे करण्यात आले आहे.
यामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीच्या संचालिका निवेदिता काळे व इतर अ‍ॅडव्होकेट महिला, रेड ट्रीच्या संचालिका लीना सलढाणा, आमदार भीमराव तापकीर यांच्या पत्नी सुवर्णा तापकीर व त्यांच्या परिवारातील इतर महिला, सूर्यदत्ता शैक्षणिक संस्थेचे संचालक डॉ. संजय चोरडिया यांच्या पत्नी सुषमा चोरडिया तसेच अ‍ॅपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन बँकिंग अँड फायनान्स अ‍ॅकॅडमीचे अजिंक्य बिजवल व त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलाही उपस्थित होत्या. पाण्यामध्ये इंडिन नसलेल्या बोटीने तरंगण्याचा अनोखा खेळ खेळणाऱ्या तारामती मातीवडेही या वेळी उपस्थित होत्या.
लोकमतच्या सखी मंचातर्फे राबविल्या जाणाऱ्या या अनोख्या उपक्रमात सार्वजनिक गणेशमंडळांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकमतप्रमाणेच पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी एक दिवस महिलांना आरतीचा मान द्यावा, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. या महिलांच्या आरतीचा फोटो मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतच्या लॉ कॉलेज रोड येथील कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्यावा किंवा ंंस्र’ीुंस्रस्रं@ॅें्र’.ूङ्मे या मेलआयडीवर मंडळाचे नाव, अध्यक्षांचे नाव व संपर्कक्रमांकासह पाठवायचा आहे. या फोटोंना योग्य ती प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Web Title: Bring progress Give it to 'Tea'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.