शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोटा भरुन काढण्यासाठी पीएमपीची नवीन ’शक्कल’.. ; चार हजार आणा, अन्यथा बदलीची कारवाई... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 15:30 IST

मागील आर्थिक वर्षात पीएमपीचा तोटा २०४ कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...

ठळक मुद्देवाहक व चालकांना एकाच मार्गावर फिक्स ड्युटी फिक्स ड्युटी असलेल्या चालक व वाहकांचे दररोजचे उत्पन्न तपासणीच्या सुचना

पुणे : तोट्यात चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या उत्पन्नांत वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्येच आता वाहक व चालकांना एका मार्गावरून तीन दिवसांत किमान चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. हे टार्गेट पूर्ण न केल्यास त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात येणार आहे. मागील आर्थिक वर्षात पीएमपीचा तोटा २०४ कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तिकीट विक्रीतून पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रशासनाने सर्वच मार्गांवरून उत्पन्न मिळविण्याचे टार्गेट वाहक व चालकांना दिले आहे. वाहतुक व्यवस्थापकांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. वाहक व चालकांना एकाच मार्गावर फिक्स ड्युटी दिली जाते. त्यांनी प्रत्येक शिफ्टमध्ये तीन दिवसांत संबंधित मार्गावर सरासरी ४ हजार रुपयांचे उत्पन्न आणावे, असे टार्गेट देण्यात आले आहे. जे वाहक, चालक टार्गेट पुर्ण करणार नाहीत, त्यांची बदली केली जाणार आहे. त्यांची फिक्स ड्युटी रद्द करून पुन्हा त्या मार्गावर पाठविले जाणार नाही. त्यांना नियमित रोटेशन शिफ्टप्रमाणे काम करावे लागणार आहे. आगार व्यवस्थापकांकडून फिक्स ड्युटी असलेल्या चालक व वाहकांचे दररोजचे उत्पन्न तपासणीच्या सुचना वाहतुक व्यवस्थापकांनी दिल्या आहेत. उत्पन्न कमी आणल्यास त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर रोजच्या रोज कारवाई करण्यात यावी, अशी तंबी देण्यात आली आहे. दरम्यान, वाहतुक व्यवस्थापकांच्या परिपत्रकानंतर वाहक व चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज संबंधित मार्गावर मिळणारे उत्पन्न निश्चित नसते. त्यामुळे टार्गेट ठरवून देणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. तर काही कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याने ही कारवाई केली जाणार आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. यामध्ये केवळ संबंधित कर्मचाऱ्यांची ड्युटी बदली जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल