शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भगवान पोखरकर यांना पोलीस बंदोबस्तात खेड तालुका पंचायत समितीत हजर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 13:57 IST

न्यायालयाचे प्रांत अधिकाऱ्यांना आदेश, भगवान पोखरकर व त्यांच्या समर्थकांनी डोणजे येथील हॉटेलात पंचायत समिती सदस्यांना केली होती मारहाण

ठळक मुद्देखेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांच्याविरुद्ध शिवसेना व मित्र पक्ष अशा ११ सदस्यांनी पोखरकर यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता

पुणे: अविश्वास ठराव दाखल केल्याने चिडलेल्या खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर व त्यांच्या समर्थकांनी डोणजे येथील हॉटेलात पंचायत समिती सदस्यांना मारहाण केली होती. हवेली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अविश्वास ठरावावरील मतदानादरम्यान पोखरकर यांना पोलीस बंदोबस्तात पंचायत समितीमध्ये उपस्थित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याप्रमाणे ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता सभापती पोखरकर यांना हवेली पोलीस घेऊन जाणार आहेत. तसे आदेश प्रांत अधिकार्‍यांनाही देण्यात आले आहेत.

खेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांच्याविरुद्ध शिवसेना व मित्र पक्ष अशा ११ सदस्यांनी पोखरकर यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याबाबत ३१ मे रोजी बहुमत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विरोधी गटातील सर्व जण डोणजे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते. हे पोखरकर यांना समजल्यावर त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी या हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड केली. सदस्यांना मारहाण करुन त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना काही अंतरावर सोडून दिले होते. याप्रकरणी हवेली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पोखरकर यांच्यासह अनेकांना अटक केली आहे.

पोखरकर यांच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी युक्तीवाद करताना अ‍ॅड. पवार यांनी सांगितले की, पोखरकर यांना राजकारणातून उठविण्यासाठी हे सर्व सुरु आहे. त्यातूनच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी आहे. यावेळी पोखरकर यांना उपस्थित राहणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी कायद्यानुसार मतदानात काय व्हायचे ते होईल पण उपस्थित राहण्याचा त्यांचा अधिकार डावलता येणार नाही. सध्या ते १ जूनपर्यंत हवेली पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे. त्यांना मतदानासाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.

त्यानुसार न्यायालयाने भगवान पोखरकर यांना पोलीस बंदोबस्तात खेड पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी ११ वाजता उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले असून तशी सूचना प्रांत यांना देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडShiv SenaशिवसेनाCourtन्यायालयPoliceपोलिस