शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

गजलमधून जीवनाचे संक्षिप्त रुप आशयात: रमण रणदिवे; गजलसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:55 IST

गजलकार व संगीतकार विजय वडवेराव लिखित व प्रतिमा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘चंद्रही पेटेल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन रणदिवे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गजल समीक्षक  डॉ. राम पंडित यांची प्रस्तावना आहे.

ठळक मुद्देविजय वडवेराव लिखित व प्रतिमा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘चंद्रही पेटेल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशनमाझी गजल समाजाच्या प्रत्येक घटकावर भाष्य करणारी : विजय वडवेराव

पुणे : गजल जीवनाचे संक्षिप्त रुप आशयातून मांडत असते. गजल जीवनानुभवाची सत्यता कलात्मक पद्धतीने उतरवलेला आशय असतो, असे मत ज्येष्ठ गजलकार रमण रणदिवे यांनी व्यक्त केले. गजलकार व संगीतकार विजय वडवेराव लिखित व प्रतिमा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘चंद्रही पेटेल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन रणदिवे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गजल समीक्षक  डॉ. राम पंडित यांची प्रस्तावना आहे. यावेळी नवी मुंबईचे उपायुक्त आणि गजलकार कैलास गायकवाड, गजलकार अनंत नांदूरकर, जनार्दन म्हात्रे, बदीउज्जमा बिराजदार, प्रा. महादेव रोकडे, विशाल राजगुरु, राज अहेरराव, अनुराधा हवेलीकर, रिना वडवेराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.रमण रणदिवे म्हणाले, ‘‘वडवेरावांच्या गजलेतील रचनेची सफाई आणि भावनेतील तरलता वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे गजल लेखन निर्दोष आहे. गजलकाराने स्वत:च्या गजलेला स्वत:च चाल लावून गायन करणे हा वेगळा प्रयोग आहे. त्यांचा हा प्रयोग गजल आणि संगीत क्षेत्रात वेगळी वाट पाडणारा आहे. गजलकार, संगीतकार आणि गजल गायक म्हणून वडवेराव आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतील.’’कैलास गायकवाड म्हणाले, ‘‘अल्पावधीत गजल लेखनांवर प्रभुत्त्व मिळवण्याचा आणि वेगळी धाटणी निर्माण करण्याचा वडवेराव यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’’विजय वडवेराव म्हणाले, रोजच्या जगण्यातील अनुभव गजलेत उतरविले आहेत. माझी गजल समाजाच्या प्रत्येक घटकावर, तसेच प्रणय, प्रेमालाप यावर भाष्य करणारी आहे. नरेंद्र गिरीधर यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन म्हात्रे यांनी आभार मानले.

 

वडवेरावांच्या ‘गजल बरसात’ने रसिक चिंबपुस्तक प्रकाशनानंतर वडवेराव यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वरचित गजलांच्या ‘गजल बरसात’ या कार्यक्रमाने  रसिक श्रोत्यांना चिंब केले. विजय वडवेराव आणि  गायिका स्मिता भद्रिके यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. रोहित वनकर (बासरी), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन), समर्थ काळोखे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), शास्त्रीय गायक शिवाजी चामनकर (संगीत संयोजन) यांनी साथसंगत केली. 

टॅग्स :Puneपुणे