देवदिवाळीनिमित्त उजळले चिंतामणी मंदिर; सुश्राव्य भजनांनी भाविक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:13 PM2017-11-20T18:13:03+5:302017-11-20T18:18:41+5:30

थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती विलोभनीय दिसत होती.

decoration in Chintamani Temple; appropriateness devdiwali | देवदिवाळीनिमित्त उजळले चिंतामणी मंदिर; सुश्राव्य भजनांनी भाविक मंत्रमुग्ध

देवदिवाळीनिमित्त उजळले चिंतामणी मंदिर; सुश्राव्य भजनांनी भाविक मंत्रमुग्ध

googlenewsNext
ठळक मुद्देदेवदिवाळीचे औचित्य साधून थेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजनश्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती दिसत होती विलोभनीयपारंपरिक पद्धतीने मातीच्या पणत्या लावून साजरा करण्यात आला दीपोत्सव

लोणी काळभोर : देवदिवाळीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती विलोभनीय दिसत होती.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी देवदिवाळी निमित्त श्रींना जरतारी पितांबर, उपरणे आदी भरजरी महावस्त्रे घालण्यात आली. तर रिद्धीसिद्धीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. चिंतामणीस मुगुट, हार, शुंडा, नाग, मोर, पोवळे, आदी रत्नजडीत अलंकारासमवेत रूद्राक्ष माळा घालण्यात आल्याने अगोदरच सर्वागसुंदर असलेल्या श्रींच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती. 
या दिवशी रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी श्रीचे पुजारी आगलावे बंधू यांचे वतीने सुश्राव्य भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना त्रास होवू नये म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे हे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. यावेळी मंदिरपरिसरात आकर्षक अशी विविधरंगी एलइडी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. याचबरोबर पारंपरिक पद्धतीने मातीच्या पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Web Title: decoration in Chintamani Temple; appropriateness devdiwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे