शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

नवरी ‘न’ मिळे नवऱ्याला; वधूपित्याच्या अपेक्षा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:18 IST

मुलासाठी वर्षभर मुलगी पाहणाऱ्या बापांच्या नशिबी घोर निराशा

खोडद : सध्या लग्नसराई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. निदान या वर्षी तरी मुलाच्या लग्नाचा बार उडवून देऊ, असे म्हणणाऱ्या व मुलासाठी वर्षभर मुलगी पाहणाऱ्या बापांच्या नशिबी यंदाही घोर निराशाच येत असल्याचे चित्र गावोगावी पहावयास मिळत आहे. त्यामुळे वरपित्याच्या तोंडी आपसूकच ‘नवरी न मिळे नवऱ्याला’ हे हताश शब्द येत आहेत.जुन्नर तालुक्यासह खोडद गावामध्ये अनेक वर्षांपासून मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाणात मुलींचे प्रमाण कमीच आहे. साºया भारतातील ही एकंदर परिस्थिती असल्याने अनेक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. शिवाय अनेक ठिकाणी महिला दिनाच्या निमित्तानेही स्त्रीचा सन्मान, सत्कार करण्यात आला मात्र आकडेवारी पाहिली तर आजही मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी असल्याचे दिसते. त्याचा थेट परिणाम मुलांवर अर्थात त्यांच्या लग्नावर झालेला दिसतो आहे.खरंतर पूवीर्पासून लग्न जुळवताना मुलाच्या बापाचाच तोरा पहायला मिळायचा, मग लग्नातील मानपान, देणे-घेणे, सर्व काही मनासारखे तो वाजवून घ्यायचा, मात्र काळ बदलला आणि मुलींचे प्रमाण कमी झाल्याने मुलींच्याच वडिलांची कॉलर सध्या उंच झालेली पहावयास मिळत आहे. ‘हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला’ मुलगी द्या असे म्हणण्याची नामुष्की सध्या मुलांच्या वडिलांवर येऊन ठेपली आहे.एखादा बाप जरी ‘दुबळा’ असला तरी पण तो आता त्याच्या घरात जन्माला आलेल्या मुलीमुळे खरा ‘श्रीमंत’ असल्याचे पहायला मिळत आहे.मुलीच्या ‘किमान’ अटी अशासरकारी नोकरीच पाहिजेखासगी कंपनीत असेल तर गलेलठ्ठ वेतन हवेकिमान १ एकर शेती हवीस्वत:चे घर हवेपुणे शहरात फ्लॅटतरी हवाएकुलता एक हवाएकत्र कुटुंब पद्धती नकोलग्नानंतर मुलीला नोकरीस पाठवायची तयारी हवीमुलगा निर्व्यसनी हवामुलीचे स्थळ सुचविण्यासाठी पाचशे रुपयेमुलींच्या कमतरतेवरसुध्दा बाजार मांडणारी एजंटचा यानिमित्ताने सुळसुळाट झाला आहे. गोड भाषेत त्यांना मध्यस्थी असे म्हटले जात असले तरी त्यांची मध्यस्थी ही धर्मादाय नसून व्यावसायिक असल्याने वरपित्याला त्यांची झळ बसते आहे. मुलाला अनुरुप मुलीचे स्थळ सुचविण्योसाठी ५०० रुपये तर त्यांच्याशी जमवून देण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत ‘शुल्क’ आकारले जात आहेत. सध्या हा मध्यस्थीचा व्यवसाय चांगचाल तेजीत चालू आहे.

टॅग्स :marriageलग्न