लाचखोर ग्रामविकास अधिका-याला अटक
By Admin | Updated: September 24, 2014 06:02 IST2014-09-24T06:02:04+5:302014-09-24T06:02:04+5:30
सदनिकांची दफ्तरी नोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या उरुळी कांचनच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

लाचखोर ग्रामविकास अधिका-याला अटक
उरुळी कांचन : सदनिकांची दफ्तरी नोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या उरुळी कांचनच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
संंपत भाऊसाहेब खरपुडे ( ४२, रा.खराडी चंदननगर, पुण ) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
त्याने खरेदी केलेल्या सदनिकांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून त्याचे दाखले देण्यासाठी त्याने एक
लाखाची मागणी केली होती.
पन्नास हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक १८४ मधील जागेवर विकसक रतिकांत बबन यादव याने सदनिका बांधल्या आहेत. त्या विकल्यानंतर त्या घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे होऊन त्याचे दाखले मिळावेत म्हणून विकसक व सदनिकाधारक पाठपुरवा करीत होते. आज करू, उद्या करू असे सांगत त्यांना आजपर्यंत ते करून दिले नाही.
शेवटी विकसक यादव व संपत खरपुडे यांच्यात तडजोड होऊन या कामी एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर यादव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागागकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रकाश शिंदे, सुनील शेटे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, पोलीस हवालदार दशरथ चिंचकर, दीपक टिळेकर, अंकुश डोम्बाळे, करुणाकरन यांच्या पथकाने सापळा रचून खरपुडे याला रंगेहात ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रकाश शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)