शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नक्कल देण्यासाठी लाच घेणारे लिपिक, भूमापक जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:59 IST

पुणे : आजच्या जमान्यात शंभर रुपये ही तशी नगण्य रक्कम आहे. पण ती कितीही कमी असली तरी लाच ही लाच असते. अशिलाचे मॅरेज पिटिशनच्या कागदपत्राच्या नकला देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

पुणे : आजच्या जमान्यात शंभर रुपये ही तशी नगण्य रक्कम आहे. पण ती कितीही कमी असली तरी लाच ही लाच असते. अशिलाचे मॅरेज पिटिशनच्या कागदपत्राच्या नकला देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे एका ५० वर्षांच्या वकिलांनी याबाबत तक्रार दिली होती. दुस-या एका कारवाईत निकाली काढलेल्या अर्जाची प्रत देण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना शिरुरमध्ये पकडण्यात आले.महेश चंद्रकांत पंडित (वय ४७, रा. मुकुंदनगर) या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी ५० वर्षांच्या वकिलाने तक्रार केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वकिलांना त्यांच्या अशिलाचे मॅरेज पिटिशन न्यायालयात दाखल आहे. या पिटिशनच्या कागदपत्राच्या नकला मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांना शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयातील नक्कल विभागात महेश पंडित हा कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांना नकला देण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर त्याची पडताळणी केल्यावर पंडित याने तक्रारदाराला या नकला देण्यासाठी शंभर रुपयांची लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला शंभर रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूकरमापकास पाचशे रुपयांची लाच घेताना पकडलेहिस्सेवारीची नोंद करण्यासाठी शिरुर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापकास पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. संदीप रोडे (वय ३९) असे या भूकरमापकाचे नाव आहे़ तक्रारदार यांनी त्यांंच्या भावाच्या हिस्सेवारीची नोंद करण्यासाठी शिरुरच्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता़ हा अर्ज निकाली काढला होता़ या अर्जाची प्रत रेकॉर्ड रुममधून काढून देण्यासाठी संदीप रोडे यांनी ५०० रुपये लाच मागितली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करुन शिरुर येथील भूमिअभिलेखा कार्यालयात सापळा रचला व संदीप रोडे यांना पकडण्यात आले.अशा प्रकारे कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. लाच ही किती रुपयांची आहे, हे न पाहता आमच्याकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करून कारवाई केली जाते. संबंधित लिपिक नेहमी लाचेसाठी त्रास देतो, असे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करीत असते, असे लाचलुचपत प्रतिबधंक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे