माथेफिरूने वर्गखोल्यांची दारे, फळे फोडले
By Admin | Updated: October 15, 2016 06:04 IST2016-10-15T06:04:24+5:302016-10-15T06:04:24+5:30
माथेफिरूने वर्गखोल्यांची दारे, फळे फोडले

माथेफिरूने वर्गखोल्यांची दारे, फळे फोडले
वडगाव निंबाळकर : येथे अज्ञात माथेफिरूने स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गखोल्यांचे दरवाजे तोडून आतील फळे फोडले आहेत. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दरेकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी शाळेला सुटी होती. विकृत व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी शाळेत प्रवेश करून वर्गखोल्यांचे दरवाजे तोडले, वर्गांमधील काचेचे दोन फळे फोडून शाळेचे २० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच, शाळेतील काही कागदपत्रे फाडून टाकली आहेत. सुटी संपून शाळा सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. परिसरातील टवाळखोरांनी हा प्रकार केल्याचा अंदाज असून यापूर्वीही शाळेच्या आवारात असे प्रकार घडले आहेत. वाडीवस्तीतून शाळेत येणाऱ्या शालेय विद्यार्थिनींनाही काही टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाचा तपास करून शाळेचे नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.