अडथळ्यामुळे शिक्षक बदलीला मुदतवाढ
By Admin | Updated: July 3, 2017 02:08 IST2017-07-03T02:08:15+5:302017-07-03T02:08:15+5:30
जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. आॅनलाईन प्रकियेमध्ये चुकीच्या माहिती आहे. यामुळे शिक्षकांना

अडथळ्यामुळे शिक्षक बदलीला मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. आॅनलाईन प्रकियेमध्ये चुकीच्या माहिती आहे. यामुळे शिक्षकांना अर्ज करण्यासाठी अडचण येत आहे. सर्व्हर अनेकदा हॅँॅग होत आहे. यामुळे बदली प्रकियेसाठी मुदतवाढ देणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिली.
जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेच्या विरोधात १ हजार ९१४ शिक्षकांची वैयक्तिक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना २४ मे रोजी न्यायालयाने १ हजार ९१४ शिक्षकांच्या वैयक्तिक बदलीला स्थगिती दिली आहे. याप्रमाणेच २५ मे रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरातील विविध २० याचिकांवर निर्णय देताना १६ जूनपर्यंत जैसे थे परिस्थितीचे आदेश दिले आहेत. हा निर्णय देताना न्यायालयाने राज्य शासनाला बदली प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने अवघड आणि सोपे क्षेत्रातील शाळांची यादी करणे आणि इतर प्रशासकीय काम सुरू केले आहे.
आॅनलाईन प्रक्रियेत दीड वर्षापूर्वीचा डाटा
शिक्षकांना आॅनलाईन बदली प्रकियेत अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. मात्र, आॅनलाईन अर्ज भरताना सर्व्हर हॅँग होत आहे. यामुळे अर्ज भरण्यासाठी खूप कालवधी लागतो. अर्ज अपूर्ण आणि अर्धवट भरला जात आहे. आॅनलाईन प्रक्रियेसाठी मुख्याध्यापकांनी शाळा आणि शिक्षकांची माहिती भरली आहे. आॅनलाईन प्रकियेतील कित्येक शाळांची माहिती अर्धवट भरली आहे. शिक्षकांची नावे चुकली आहे. आॅनलाईन प्रक्रियेत दीड वर्षापूर्वीचा डाटा आहे. काही शाळाची नाव नाहीत. या गोंधळामुळे शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहे. यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होते.
विशेष संवर्ग, पती-पत्नी, अवघड भाग आणि त्यांनतर इतर शिक्षकांची बदली होणार आहे. शाळा चालू झाल्या आहेत. अजून विशेष संवर्गतील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहे. सर्व्हर हँग होत आहे. बदली प्रकियेमध्ये गोंधळ होत आहे. मग इतर शिक्षकांच्या बदली प्रकिया होणार का नाही, याबाबत शंका आहे. बदलीच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक अडचणी आहेत.
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, पुणे
जिल्हा शिक्षक संघटना
आॅनलाईन भरतीचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सर्व्हर हॅँग होत आहे. तसेच तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे अर्ज भरण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढ देण्यात येणार आहे.
- नवनाथ वणवे, उपशिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद