शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 12:35 IST

तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के इतका लागला आहे. 

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल  ९०.६६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख  ८१ हजार ७१२  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होता. मात्र, विद्यार्थी व पालकांची निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर सर्व अडचणींवर मात करून गुरुवारी राज्य मंडळाने निकाल जाहीर केला.------------ विभागीय मंडळ निहाय निकाल

 पुणे  :९२. ५० टक्के

नागपूर : ९१.६५  टक्के

औरंगाबाद :८८ .१८ टक्के

 मुंबई  :८९ .३५ टक्के

कोल्हापूर  :९२ .४२ टक्के

 अमरावती  :९२.०९  टक्के 

 नाशिक :८८ .८७ टक्के

लातूर  : ८९. ७९ टक्के

कोकण : ९५ . ८९ टक्के-----------------शाखानिहाय निकाल कला - ८२.६३ वाणिज्य - ९१.२७ विज्ञान - ९६.९३व्यवसायिक अभ्यासक्रम- ८६.०७

 या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल१) www.mahresult.nic.in२)www.hscresult.mkcl.org३)www.maharashtraeducation.com--------राज्य मंडळातर्फे सकाळी ११ वाजता निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र,पुण्यात लॉकडाऊन असल्यामुळे राज्य मंडळाच्या काही कर्मचाऱ्यांना  पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. परिणामी मंडळातील कर्मचार्‍यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे सकाळी ११ ऐवजी बारावीचा निकाल ११.४५ वाजता जाहीर झाला, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल