कोरोनाचे नियम मोडणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:29+5:302021-03-09T04:11:29+5:30
बारामतीत ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल बारामती : बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागत कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव ...

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या
बारामतीत ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल
बारामती : बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागत कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोरोमा नियमावलीचे पालन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत १०२ नागरिकांकडून ५२
हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस,
नगरपालिका व महसूल विभाग यांचेमार्फत करण्यात आली. या कारवाईमध्ये
विनामास्क फिरणारे नागरिक, विनामास्क व्यवसाय करणारे व्यावसायिक,
गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टसिंग न पाळणारे नागरिक यांचा समावेश आहे.
तसेच, शहरामध्ये जे नागरिक कोव्हिड पॉझिटव्ह असून देखील वैद्यकीय अधीक्षक
यांची परवानगी नसताना देखील स्वत:हून घरी राहत आहेत अशा ८ रुग्णांना
शहरातील बुरूड गल्ली, तांबेनगर, जामदार रोड येथून सिल्व्हर ज्युबिली
रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी प्रशासनाकडून नागरिकांनी मास्क ,
सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास
सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
फोटोओळी बारामतीत कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
०८०३२०२१ बारामती ०४