शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक
3
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
4
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
5
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
6
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
7
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
8
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
9
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
10
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
11
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
13
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
14
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
15
IND vs PAK मॅचबद्दल प्रश्न विचारला; सुरक्षा रक्षक संतापला, YouTuber ची गोळ्या झाडून हत्या
16
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 
17
"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण
18
Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार
19
सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी
20
Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!

ब्रेकडाऊन पीएमपीला ‘ब्रेक’ लावण्याचे आदेश

By admin | Published: April 02, 2017 2:47 AM

देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे

पुणे : देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सध्याचे ब्रेकडाऊनचे प्रमाण २० ते ३० टक्के असून, ते दहा टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असा आदेश त्यांनी सर्व आगारप्रमुखांना दिला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच महत्त्वाचे निर्णय घेऊन पीएमपीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कामाची वेळ बदलण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा दिवस विनावेतन करण्यात आला. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठीही आता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सद्यस्थितीत पीएमपीच्या २७५ ते ३०० बस दररोज मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पीएमपीला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. पीएमपीची प्रतिमाही खराब झाली आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या व भाडेतत्त्वावरील एकूण २०३६ बसेस असून, त्यातील सुमारे १३०० ते १४०० बसेस दररोज मार्गावर असतात. मात्र त्यातील सरासरी २७५ ते ३०० बसेस रोज अनेक कारणांमुळे ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांच्या घरात आहे. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक बस सातत्याने बंद पडतात. (प्रतिनिधी)