ब्रेक फेल पीएमपीचा नेहरू रस्त्यावर थरार

By Admin | Updated: October 30, 2015 00:30 IST2015-10-30T00:30:19+5:302015-10-30T00:30:19+5:30

गुलटेकडीकडून लोहगावकडे जात असलेल्या पीएमपी बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास नाना

Breakdown PMP throws up on Nehru road | ब्रेक फेल पीएमपीचा नेहरू रस्त्यावर थरार

ब्रेक फेल पीएमपीचा नेहरू रस्त्यावर थरार

पुणे : गुलटेकडीकडून लोहगावकडे जात असलेल्या पीएमपी बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास नाना पेठेतील हॉटेल आईनासमोर घडली. चालकाने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या आईना हॉटेलच्या दिशेने घेतली. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वाहनांना धडकवत ही बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे आणि रस्त्यावरील वाहनचालकांचे प्राण वाचल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी हेल्प फाउंडेशनचे यासीन शेख यांनी दिली.
गुलटेकडीकडून लोहगावच्या दिशेने पीएमपी बस जात होती. रामोशी गेट चौक ओलांडून ही बस नेहरू रस्त्याने पुणे स्टेशनच्या दिशेने जात होती. आईना हॉटेल चौकाच्या अलीकडेच या बसचे ब्रेक निकामी झाले. बसचा वेग अधिक असल्यामुळे चौकात असलेल्या वाहनांना तसेच वाहनचालकांना धडक बसण्याचा धोका होता. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत ही बस आईना हॉटेलच्या दिशेने घेतली. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना या बसची जोरात धडक बसली. परंतु त्यामुळे ही बस जागेवरच थांबली. बस बाजूला घेत असताना डाव्या बाजूच्या दिशेने आलेल्या मोटारीला बस घासली गेली आणि सायकलस्वाराला धडकली. यामध्ये मोटारचालक आणि सायकलस्वार किरकोळ जखमी झाले.
सुदैवाने ज्या ठिकाणी बस थांबली, तेथेच महावितरणच्या असलेल्या डीपीला धडक बसली नाही. अपघातानंतर बघ्यांची एकच गर्दी घटनास्थळावर जमा झाली होती. हॉटेलचालकाने बसचालकाला बसमधून खाली उतरवले. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता. त्यांना पाणी देऊन जमा झालेल्या गर्दीला समजावले. यासीन शेख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना खाली उतरवले. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही; तसेच जीवितहानी झाली नाही.

Web Title: Breakdown PMP throws up on Nehru road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.