शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लांडेवाडीच्या भिर्रला कोरोनाचा ब्रेक; बैलगाडा शर्यती रद्द, शाैकिनांचे ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:30 IST

पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश :

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर (जि. पुणे) : बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर राज्यात आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शनिवारी पहिल्यांदा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश काढत यात्रांवर बंदी घालत ही शर्यत रद्द करण्यास सांगितले. याचा शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी निषेध करीत बैलगाडा मालकांसमवेत सकाळी शर्यतीच्या घाटातच ठिय्या आंदोलन केले. 

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानंतर सर्वात प्रथम लांडेवाडी ग्रामस्थांनी शीतलादेवी यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केला होता. सर्व पूर्तता झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेला परवानगी दिली होती. तब्बल २५० बैलगाडे शर्यतीत सहभागी होणार होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शर्यतीला स्थगिती दिल्याचा आदेश काढला. 

प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. विरोध होऊ नये म्हणून रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही शर्यत होऊ नये म्हणून षड्यंत्र रचले गेले, याचा मी निषेध करतो.- शिवाजीराव अढळराव पाटील, शिवसेना उपनेते

कोरोनामुळे राज्यावर आलेले संकट मोठे असून, बैलगाडा शर्यतीसारख्या कार्यक्रमांना मुरड घालायला हवी. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस