शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी फिरवली भाकरी; यवत मुक्कामी पिठलं-भाकरीचा बेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:35 IST

अस्सल ग्रामीण चवीचा तडका असलेले खमंग पिठलं वारकऱ्यांच्या विशेष पसंतीचे

यवत : अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही यवतकरांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी एक टनाचे पिठलं आणि लाखभर भाकरी याची मेजवानी दिली. वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्यची परंपरा यवतकरांनी जपली आहे. आज सकाळ पासून गावातील ग्रामस्थांची पालखी मुक्काम असलेल्या श्री काळ भैरवनाथ मंदिरात पिठले बनविण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थ एकत्र येवून पिठले भाकरीची मेजवानी देत असतात. घरोघरी भाकरी बनवून मंदिरात एकत्र केल्या जातात. साडेतीनशे किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी मंदिराच्या भटारखान्यात महिलां करवी बनविण्यात आल्या. त्याठिकाणी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वतः भाकरी बनविण्याचा अनुभव घेतला.          यवत येथे ग्रामीण भागातील तसा पहिलाच मुक्कमा असतो. या दिवशी वारीतील सुमारे एक लाख वारकऱ्यांना पुरेल इतके जेवण बनवण्याची यवतकरांची परंपरा आहे. अस्सल ग्रामीण चवीचा तडका असलेले खमंग पिठलं वारकऱ्यांच्या विशेष पसंतीचे बनले आहे. एका कढईत वीस किलो बेसण पिठ व चाळीस किलो इतर साहित्य असे मिळून साठ किलो पिठलं बनते. अशा सुमारे चौदा ते पंधरा कढयांमध्ये हे पिठले बनवले जाते. गावातील तरूण मंडळी मेहनत घेतात तर जेष्ठ मार्गदर्शन करतात. सायंकाळी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण वाढण्याचे काम केले जाते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी फिरवली भाकरी       एकीकडे राजकिय पटलावर भाकरी फिरविण्याची चर्चा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाली. आज यवत येथे पालखी मुक्काम ठिकाणी ग्रामस्थांची पिठलं भाकरी बनविण्याची लगबग सुरू असताना खासदार सुळे यांनी भेट दिली. त्यांनी पिठले भाकरी बनविण्यासाठी असलेल्या परंपरेची माहिती घेत मदतही केली. भटारखान्यात महिला भाकरी बनवित असताना तेथे स्वतः भाकरी बनविण्याचा अनुभव घेतला. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीSocialसामाजिक