आचारसंहिता भंग, सहा गुन्हे दाखल
By Admin | Updated: September 28, 2014 00:08 IST2014-09-28T00:08:07+5:302014-09-28T00:08:07+5:30
बाबूराव चांदेरे व मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मुंबई पोलीस अॅक्ट 37(3),135 व 188 नुसार जमावबंदी कायदा व वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आचारसंहिता भंग, सहा गुन्हे दाखल
>कोथरूड : कोथरूड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना पोलिसांची पूर्व परवानगी न घेता मिरवणुका काढून वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे व भाजपाच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मुंबई पोलीस अॅक्ट 37(3),135 व 188 नुसार जमावबंदी कायदा व वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात उमेदवाराने मिरवणुका व सभांच्या कार्यक्रमासाठी निवडणूक कार्यालयाच्या एक खिडकी योजनेतून पूर्वपरवानगी घेण्याची गरज असतानाही बाबूराव चांदेरे व मेधा कुलकर्णी या दोन्ही उमेदवारांनी विनापरवाना रॅलीचे आयोजन केले होते. काल झालेल्या मेधा कुलकर्णी यांच्या अनियोजित प्रचार रॅलीत काही कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वादंग झाला होता. त्यातच आज बाबूराव चांदेरे यांनीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विनापरवाना रॅलीचे नियोजन केले होते. कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे व पोलीस उपनिरीक्षक संथ यांनी फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)
1 विनापरवाना रॅली काढून मर्यादेपेक्षा अधिक वाहने रॅलीमध्ये वापरल्याप्रकरणी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
2 सहकारनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती विशेष शाखेच्या अधिका:यांनी दिली. यासोबतच निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यांमध्येही आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
3 भोसरी पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकत्र्याविरुद्ध परवानगीपेक्षा अधिक वाहने रॅलीमध्ये वापरल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, निगडी पोलीस ठाण्यातही रॅलीसंबंधी गुन्हा दाखल केले.