शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन ब्राझिलियन पत्नीचा छळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:05 IST

चारित्र्यांच्या संशयावरून पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणा-या पतीला न्यायालयाने फटकारले आहे.

ठळक मुद्देपतीवर बालकांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : वंशाला दिवा हवा आणि चारित्र्यांच्या संशयावरून ब्राझिलियन पत्नीचा मानसिक व शारिरीक छळ करणा-या पतीला न्यायालयाने फटकारले आहे. पत्नी राहत असलेल्या घरात जायचे नाही. पत्नी व मुलांचा कोणत्याही प्रकारे छळ करायचा नाही, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांच्या न्यायालयाने दिला आहे. मियामा आणि विल्सन (नावे बदलेली) असे या पती-पत्नीचे नाव आहे. मियामा ही मुळची ब्राझीलची असून तिने भारतीय नागरिक असलेल्या विल्सन बरोबर १९९९ साली प्रेम विवाह केला.   मियामा ही शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला असून विल्सन हा एक एनजीओ चालवतो. पहिली मुलगी झाल्यानंतर वंशाला दिवा म्हणून आपल्याला मुलगाच हवा, अशी मागणी विल्सन वारंवार करत होता. तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तो तिला मानसिक व शारीरिक त्रासही देवू लागला. दरम्यान, तक्रारदार पत्नीला तीन मुली झाल्या. त्यामुळे त्याच्याकडून होणा-या छळात वाढ होत गेली. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने न्यायालयाधात धाव घेतली. पीडितेने अ‍ॅड. अभिजीत निमकर आणि अक्षत कुमार यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. निमकर यांनी दिली. या प्रकरणात ब्राझील दूतावासाने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, मियामा यांना त्या काम करीत असलेल्या कंपनीने हंगेरी येथील कार्यालयात व्यवस्थापक पदाची आॅफर दिली आहे. त्यामुळे तिने मुलींसह हंगेरीला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विल्सन याने हरकत नसल्याचे पत्र दिले होते. मात्र, आता त्याने मुलींचा ताबा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. पण विल्सन यांच्यावर बालकांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे मुलींना त्याकडे ठेवणे धोकादायक असल्याचे अ‍ॅड. निमकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनात आणून दिले.            

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयBrazilब्राझीलWomenमहिलाCrimeगुन्हा