शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘महा फार्म्स’च्या द्वारे शेतमालाचे ब्रॅण्डिंग, राज्यात स्वत:चा ब्रॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 5:52 AM

आनंद मिल्क युनियन लिमिटेड अर्थात ‘अमूल’ने गुजरातमधील दूध उत्पादकांच्या जीवनात क्रांती आणली.

- विशाल शिर्केपुणे : आनंद मिल्क युनियन लिमिटेड अर्थात ‘अमूल’ने गुजरातमधील दूध उत्पादकांच्या जीवनात क्रांती आणली. तोच आदर्श घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी राज्याचा ‘महा फार्म्स’ ब्रॅण्ड आणला आहे. त्या अंतर्गत तब्बल १९० हून अधिक उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत. त्यासाठी ३०० विक्री केंद्रांच्या (कॉप शॉप) माध्यमातून बाजारात उतरण्याची तयारी करण्यात आली आहे.महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमसीडीसी) या सरकारने स्थापन केलेल्या कंपनीच्या मार्फत ‘महा फार्म्स’ हा ब्रॅण्ड बाजारात आणण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये पंजाबमधे या ब्रॅण्डचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यात पुण्यातील बावधन येथील पेबल्स सोसायटी, ठाणे, मुंबई आणि नेरुळ येथील निवडक ठिकाणी मोजकीच उत्पादने घेऊन या शॉपची सुरुवात करण्यात आली होती. प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स), शेतकरी कृषी उत्पादन कंपनी आणि बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू कॉप शॉपच्या माध्यमातून उपलब्ध होतील.सध्या, शहरी भागात १६२ आाणि ग्रामीण भागात ५४१ विक्री केंद्रातून मोजक्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात मसाले, गूळ, सुकामेवा अशा उत्पादनांचा समावेश आहे. त्यातही कायमस्वरुपी असणारी विक्री केंद्र केवळ पाच ते सहाच आहेत. उरलेली विक्री फिरत्या वाहनांच्या माध्यमातून होते. आता ‘कॉप शॉप’ आणि ग्राहकपेठे सारख्या सहकारी संस्था, मॉल्स यांच्याशीही करार करण्यात येईल. त्यामुळे लवकरच ग्राहकांना शेतकऱ्यांचा स्वत:च्या ब्रॅण्डच्या वस्तू विकत मिळतील.‘कॉप शॉप’मध्ये मिळतील या वस्तूमिरची पूड, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर डाळ, पीठ, आवळा कॅण्डी, मध, लोणचे, तूप, चहा मसाला, सेंद्रीय उत्पादने, रसायन विरहीत गूळ, फळांचा रस, कांदा मसाला, शेंगदाणा चटणी, सुका मेवा आदी.ग्राहक - शेतकरी...दोघांच्या फायद्यासाठी!अटल अर्थसहाय्य योजनेतून राज्यात लवकरच ३०० हून अधिक ‘कॉप शॉप’ उभारले जातील. पाचशे ते एक हजार सदनिका असलेल्या सहकारी गृहसंस्था, ‘ग्राहक पेठ’ यासारख्या सहकारी संस्था, अपना बाजार, भारती बाजार, सह्याद्री बाजार आणि नामांकित कंपन्यांच्या मॉलशी करार केले जातील. ग्राहकांना स्वस्तात माल मिळेल याची काळजी घेण्यात येणार आहे. - विजय गोफणे,राज्य व्यवसाय, विपणन अधिकारी,सहकार विकास महामंडळ८० कोटी रुपयांना मंजुरीअटल अर्थसहाय्य योजनेला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली असून, त्या अंतर्गत ‘कॉप शॉप’साठी ८० कोटी ४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र