शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मोसच्या क्रुझला पुण्याचे बुस्टर,एचईएमआरएल घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:53 IST

पुणे : सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस या जगातील सर्वांत वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला.

पुणे : सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस या जगातील सर्वांत वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला. या क्षेपणास्त्राच्या प्रारंभीच्या स्टेजमधील बुस्टर यंत्राची निर्मिती आता भारतातच करण्यात येणार असून, पुण्यातील हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) या संस्थेमार्फत ते बनविण्यात येणार आहे, अशी माहिती डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेचे डायरेक्टर जनरल (आर्मामेंट अँड काँबॅक्ट इंजिनिअरिंग) पी. के. मेहता यांनी दिली.पुण्यात हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) येथे ११ व्या हाय एनर्जी मटेरियल सायन्स आणि प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. ‘इमर्जिंग ट्रेंड इन हाय परफॉर्मन्स- इन्सेन्सिव्हिटी अँड ग्रीन एनर्जी’ या विषयावर ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी एचईएमआरएलचे डायरेक्टर के. पी. एस. मूर्ती, भारत डायनामिक्स लिमिटेडचे अध्यक्ष व्ही. उदय भास्कर उपस्थित होते.मेहता म्हणाले, देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात एचईएमआरएलची महत्त्वाची भूमिका आहे. क्षेपाणास्त्र हवेत उडण्याच्या पहिल्या अवस्थेत लागणाºया यंत्रापासून ते शेवटच्या अवस्थेपर्यंत एचईएमआरएलतर्फे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असून, ते भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी संयुक्तपणे निर्माण केले आहे. या क्षेपणास्त्रातील महत्त्वाचे प्रारंभीच्या स्टेजमधील बुस्टर इंजिन हे रशियातून येत होते. मात्र, या पुढे हे बुस्टर देशातच बनविण्यात येणार आहे. पुण्यातील एचईएमआरएलद्वारे त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. भविष्यात या क्षेपणास्त्रात संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सध्या हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, पाण्यातून तसेच आता हवेतूनही डागता येऊ शकते. सुखोई ३० या विमानामुळे या क्षेपणास्त्राची मारकक्षमता वाढली आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. डीआरडीओ संस्थेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. भविष्यात शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. लष्कराला लागणारे टॅक्टिकल तसेच आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार आहे.>पर्यावरणपूरक स्फोटकांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशीलशस्त्रास्त्रांध्ये वापरण्यात येणारी स्फोटके पर्यावरणपूरक कशी असतील, यावर संशोधन सुरू आहे. स्फोटकामधून निघणारे कार्बन मोनोक्साईडसारखे घटक अतिशय हानिकारक असतात. हे घटक कमी करण्यासाठी एचईएमआरएलद्वारे संशोधन सुरू आहे. अशा दोन स्फोटकांची निर्मिती करण्यात आली आहे. अजून त्यावर चाचण्या घेणे सुरू आहे, असे एचईएमआरएलचे चेअरमन के. पी. एस. मूर्ती यांनी सांगितले.भारतीय बनावटीचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र लवकरच लष्करात होणार दाखल...इस्राईलकडून भारताने स्पाईक क्षेपणास्त्र खरेदी करण्यास नकार दिला आहे. डीआरडीओमार्फत या स्वदेशी बनावटीचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात येत आहे. या क्षेपणास्त्राच्या काही चाचण्या झाल्या आहेत.हे क्षेपणास्त्र भारतीय बनावटीच्या अर्जुन या रणगाड्यातून डागता येणार आहे. २०१८मध्ये आणखी काही चाचण्या करून २०१९पर्यंत हे क्षेपणास्त्र लष्कराला देण्यात येणार असल्याचे एचईएमआरएलचे चेअरमन के. पी. एस. मूर्ती आणि पी. के. मेहता यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे