शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध; पोलीस आयुक्तांना देणार निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 15:20 IST

‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे.

ठळक मुद्देचित्रपट हा लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारितहिंदू धर्मातील दशक्रिया विधींसह एकूणच प्रथा, परंपरेवर चित्रपटातून परखड भाष्य

पुणे : ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘ब्राम्हण लोक स्वत: चे पोट भरण्यासाठी दशक्रिया विधी करतात’ अशी खोचक टिप्पणी करीत ब्राम्हणांसह हिंदू धर्मालाच टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघाचे पदाधिकारी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना भेटून निवेदन देणार आहेत तसेच चित्रपटगृहाच्या मालकांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये असेही महासंघाच्या वतीने सांगण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून, संदीप पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट  असे पुरस्कार देखील  मिळाले आहेत.  येत्या शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदू धर्मातील दशक्रिया विधींसह एकूणच प्रथा, परंपरेवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्याने त्यातील आक्षेपार्ह मुद्यांवरच  ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. 

 

सातत्याने ब्राम्हण आणि विशेषत: हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम सुरू आहे. आता चित्रपटांमधूनही त्यांना  लक्ष्य केले जात आहे. बाजीराव पेशवे यांनी पुण्यात बसून सात राज्यांवर राज्य केले, त्यांची बायको मस्तानी अशी भर सभेत नाचेल का? हिंदू धर्मातील इतिहासाचे विकृतीकरण करण्याचाच हा भाग आहे, जे कदापि सहन केले जाणार नाही. ब्राह्मणांसह सगळे हिंदू सॉफ्ट टार्गेट आहेत. काहीही केले तरी खपवून घेऊ असे वाटत असल्यानेच हे प्रकार होत आहेत. ब्राम्हण जातीतील कुणाही व्यक्तीचे निधन झाले की त्यांच्या पश्चात विधी करण्याची पद्धत आहे. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. - आनंद दवे, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ

 

मी ‘दशक्रिया’ ही कादंबरी २२ वर्षांपूर्वी लिहिली आहे. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये या कादंबरीचा समावेश करण्यात आला असून, या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. कादंबरीमध्ये ब्राम्हणांवर टीका करण्यात आलेली नाही. केवळ मानवी प्रवृत्तींविरोधात भाष्य करण्यात आले आहे. मुळात चित्रपटाला विरोध करणार्‍यांनी हा चित्रपट पाहिला आहे का? या चित्रपटात काय मांडल आहे ते आधी प्रेक्षकांसह विरोधकांनी पाहावे अशी कळकळीची विनंती मी करतो.- बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक 

 

 

 

टॅग्स :entertainmentकरमणूकPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र