सावकारी परवान्यासाठी लाच घेणारा गजाआड

By Admin | Updated: March 11, 2017 03:36 IST2017-03-11T03:36:43+5:302017-03-11T03:36:43+5:30

सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी एजंटाकडे ३० लाखांची लाच मागून ती लाच स्वीकारत असताना मार्केट यार्ड येथील उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकाऱ्याला

Bouncing | सावकारी परवान्यासाठी लाच घेणारा गजाआड

सावकारी परवान्यासाठी लाच घेणारा गजाआड

पुणे : सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी एजंटाकडे ३० लाखांची लाच मागून ती लाच स्वीकारत असताना मार्केट यार्ड येथील उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.
संभाजीराव काशिनाथ पांढरे (वय ५३, रा. सोना गार्डन, फ्लॅट क्रमांक २६, सहकारनगर २) असे अटक करण्यात आलेल्या सहकार विभागातील अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका एजंटाने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे अधिकृत एजंट म्हणून काम करतात.
त्यांच्याकडे दोन जणांनी सावकारी परवाना मिळवून देण्याचे काम दिले होते. तसे अधिकारपत्र त्यांना देण्यात आले होते.
संबंधित एजंटाने परवान्यासाठी सहकारी संस्था, उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्या वेळी पांढरे याने परवान्यासाठी अनुकूल अहवाल तयार करून तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पाठविण्यासाठी ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये सापळा लावण्यात आला. तेथे लाच स्वीकारत असताना पांढरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bouncing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.