‘बाटलीबंद’ बेपर्वाईला चाप

By Admin | Updated: May 10, 2017 03:59 IST2017-05-10T03:59:08+5:302017-05-10T03:59:08+5:30

‘बाटलीबंद पाण्यातून आरोग्याशी खेळ’ याविषयी लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाचे

'Bottled' uncertain arc | ‘बाटलीबंद’ बेपर्वाईला चाप

‘बाटलीबंद’ बेपर्वाईला चाप

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव मूळ : ‘बाटलीबंद पाण्यातून आरोग्याशी खेळ’ याविषयी लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांनी पुणे विभागातील सर्व अधिकाऱ्यांना अनधिकृत मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
जल हे जीवन असताना पूर्व हवेलीच्या कानाकोपऱ्यात घरोघरी शुद्ध पाण्याचा नावाखाली अशुद्ध पाण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरू आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पात फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळाच गायब असल्याचे सर्वेक्षणात उघडकीस आले होते. यामुळे नागरिकांचे जीवनच धोक्यात आले आहे. कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला असतानाही कारवाई होत नव्हती. विनापरवाना बंद बाटलीत कचरा व काही न विरघळणारे घटक आढळूनही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मूग गिळून गप्प होते. पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रणाच अनेक ठिकाणी नसल्यामुळे पाणी माफिया सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळत होते. शुद्धतेसाठी असलेल्या शास्त्रीय अशा १४ प्रक्रिया पूर्ण करून पाणी शुद्ध करण्यास बहुतांश प्रकल्प मालक टाळाटाळ करीत आहेत. तसेच, २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियमही सर्रास पायदळी तुडवला जात आहे. प्रशासनाचे अधिकारी पाणी प्रक्रिया उद्योगाकडे फिरकले नाहीत. यामुळे एफडीए प्रशासनाकडूनच पाणी विक्रेत्यांना पाठबळ मिळत असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. या वृत्ताची दखल घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे विनापरवाना पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: 'Bottled' uncertain arc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.