पुणे : पैशांसाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संगणक अभियंता पतीसह सासूला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आकाश सुनील शिंदे (वय ३१) व मंगल सुनील शिंदे (वय ५३, दोघेही रा. नऱ्हे) अशी आरोपींची नावे आहेत, तर सासरे, नणंद, चुलतसासरे व मामेसासरे अद्याप फरार आहेत. वृषाली आकाश शिंदे (वय २९) यांनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे भाऊ राहुल शिवाजी काळे (वय ३१, रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक
By admin | Updated: February 15, 2017 02:29 IST