शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून दोघांना कोयत्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:47 IST

एक गंभीर जखमी : इंदापूरमध्ये आठ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

इंदापूर : तालुक्यातील हेमंत अशोक वाघमोडे (पाटील) यांच्या जिगर ग्रुपमधून दोन तरुण बाहेर पडले, म्हणून त्या तरुणांना जिगर ग्रुपच्या ८ तरुणांच्या टोळक्याने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील वेलपानाच्या बाजारात जबर मारहाण करून, एकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याने आठ तरुणांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

या प्रकरणी सागर महादेव सावंत (वय २१, रा. सुगाव, ता. इंदापूर) याने आरोपी पप्पू मासाळ, सूर्या सुनील मासाळ, रवी मासाळ, काक्या सोलनकर, बबलू मदने, गणेश सोलनकर, राम भाळे (सर्व रा. काटी, ता. इंदापूर) व शिवा खरात (रा. खोरोची, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सागर सावंत आणि त्याचा मित्र सतीश दगडू व्यवहारे हेमंत अशोक वाघमोडे (पाटील) यांच्या जिगर ग्रुपचे सदस्य होते. त्या ग्रुपमध्ये प्रत्येक गावातील १० ते १५ तरुण मुले सदस्य आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून हेमंत वाघमोडे तालुक्यातील गावागावात दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याने व त्याने मध्यंतरी काटी गाव येथे भांडण केल्यामुळे त्या ग्रुपमधून आम्ही दोघे मागील चार ते पाच महिन्यांपूर्वीबाहेर पडलो. शुक्रवारी (दि. २८) दुपारी १२ वाजता सतीश व्यवहारे याला ग्रुपमधील काही सदस्य धमकी देत असल्याचे सतीशने सागरला सांगितले. यानंतर दोघे पाने आणण्यासाठी पानमळ्यात गेले.त्यानंतर दुपारी २.३० वाजता ते दोघे पाने घेऊन मोटारसायकलवरून निमगाव केतकीला गेले. तेथे दुपारी ३.३० वाजता पान बाजार येथील तळावर मोटारसायकलवरच असताना त्या ठिकाणी पप्पू मासाळ, सूर्या सुनील मासाळ, रवी मासाळ, काक्या सोलनकर, बबलू मदने, गणेश सोलनकर, राम भाले, शिवा खरात दुचाकीवरून येत त्यांच्याहातातील कोयता, तसेच तलवारीने दोघांना मारहाण करण्याससुरुवात केली. आरडाओरड्यामुळे निमगाव केतकी येथील बरेच लोक जमा झाले. यामुळे मारेकरी तेथून पळून गेले. या घटनेत सतीश व्यवहारे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी