प्रवाशाला लुटणारे दोघे जेरबंद

By Admin | Updated: October 12, 2016 01:45 IST2016-10-12T01:45:11+5:302016-10-12T01:45:11+5:30

लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशाला मोटारीत कोंबून लुटणाऱ्या विनायक साहेबराव मिडगुळे व पंकज महादू खिलारे (वय २५, रा. शिक्रापूर, शिरूर) या दोघांना

Both of the robbers robbed the robber | प्रवाशाला लुटणारे दोघे जेरबंद

प्रवाशाला लुटणारे दोघे जेरबंद

पुणे : लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशाला मोटारीत कोंबून लुटणाऱ्या विनायक साहेबराव मिडगुळे व पंकज महादू खिलारे (वय २५, रा. शिक्रापूर, शिरूर) या दोघांना सहकारनगर पोलिसांनी बारा तासांच्या आत गजाआड केले. चंद्रजित उत्तमराव सोमवंशी यांनी फिर्याद दिली आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेले सोमवंशी पुण्याला शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचले.
स्वारगेट बसस्थानकाबाहेर उभे राहून नऱ्हे येथे जाण्यासाठी ते वाहन मिळतेय का, ते पाहत होते. आरोपींनी मोटार थांबवत त्यांना कात्रजला सोडतो, असे सांगितले. त्यांच्या सोबत गेलेल्या सोमवंशी यांच्या गळ्याला एका आरोपीने लोखंडी हुक लावले, तर दुसऱ्याने मारहाण केली. त्यांना मोटारीतून खाली ढकलून देत आरोपी पसार झाले होते.
मोटार भाड्याने हवी असल्याचे सांगत पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Both of the robbers robbed the robber