शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 14:30 IST

या निवडीनंतर आता दोन्ही गटांचे पदाधिकारी आता एकमेकांविरोधात दंड थोपटण्याचे संकेत आहेत....

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहेरघरी राष्ट्रवादीचेच दोन्ही गट आता आमनेसामने येणार आहेत. अजित पवार यांनी भाजपबरोबर जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारामतीच्या राजकारणाची गणिते बदलली आहेत. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागील महिन्यात निवडी पार पडल्या. त्यापाठोपाठ बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ एस.एन. जगताप यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यावेळी उपस्थित होते. या निवडीनंतर आता दोन्ही गटांचे पदाधिकारी आता एकमेकांविरोधात दंड थोपटण्याचे संकेत आहेत.

यानिमिताने बारामतीत शरद पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे संकेत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे पवार विरुद्ध पवार अशा जोरदार लढती रंगण्याचे संकेत आहेत.

बारामतीतील सर्व संस्था अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून संस्था पदाधिकारी निवड अजित पवारच निर्णय घेत असत. त्यामुळे अजित पवार यांचीच कार्यकर्त्यांवर पकड मजबूत आहे. परिणामी त्यामुळे शरद पवार गटाला पक्षाचे माहेरघर अडचणीचे ठरले होते. सुमारे साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर आता पदाधिकारी कल जाहीर करू लागले आहेत. काही प्रमुख नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले आहे.

शरद पवार गटाकडून लवकरच बारामती शहरात पक्ष कार्यालय सुरू केले जाणार आहे. याशिवाय पक्षाचे शहराध्यक्ष व अन्य निवडी लवकरच केल्या जाणार आहेत. या गटात कोण कोण जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या असणाऱ्या पक्ष कार्यालयाचा ताबा कोणाकडे राहणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी निवडणुकांवर या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची व्यूहरचना महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस