निरादेवघर धरणात दोघे बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST2021-01-02T04:10:37+5:302021-01-02T04:10:37+5:30
अंकुश गोपाळ निगडे (वय ३६, रा. वडतुंबी, ता.भोर), कपील भेदे (वय ३५ रा नांदेड) अशी धरणात बुडालेल्या तुरूणांची नावे ...

निरादेवघर धरणात दोघे बुडाले
अंकुश गोपाळ निगडे (वय ३६, रा. वडतुंबी, ता.भोर), कपील भेदे (वय ३५ रा नांदेड) अशी धरणात बुडालेल्या तुरूणांची नावे आहेत. भोर महाड रस्त्यावरील देवघर गावात स्मशानभुमीचे काम सुरु आहे. येथे काम करणारे अंकुश गोपाळ निगडे (वय ३६, रा. वडतुंबी ता भोर), कपील भेदे (वय ३५, रा. नांदेड) तसेच त्यांचा एक मित्र असे तीघे देवघर गावाजवळ असलेल्या निरादेवघर धरणात पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. तर एकजण वाचला. दरम्यान पाण्यात बुडताना वाचलेल्या तरुणाने गावात जाऊन धरणात दोघेजन बुडाल्याची माहिती दिली. गावातील नागरीक धरणावर गेले. त्यानंतर भोर पोलीसांना माहिती दिल्यावर पोलीसांनी भोर शहरातील भोईआळी येथील तरुणांना पाचारण केले. दोघांना शोधण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. संध्याकाळी ७ च्या सुमारास दोघांचेही मृतदेह शोधन्यात यश आले.