गणेश विसर्जनावेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:13 IST2021-09-21T04:13:36+5:302021-09-21T04:13:36+5:30

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील हवालदारवस्तीजवळ रविवारी (दि.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आळंदीलगत डुडुळगावच्या माऊलीवस्ती ...

Both drowned in Indrayani during Ganesha's immersion | गणेश विसर्जनावेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू

गणेश विसर्जनावेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील हवालदारवस्तीजवळ रविवारी (दि.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आळंदीलगत डुडुळगावच्या माऊलीवस्ती येथील ठोंंबरे कुटुंबीय इंद्रायणीकडे गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यांच्या पैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय ३०), नितीन अर्जुन ठोंंबरे (वय ३९), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) हे चौघे पाण्यात मूर्ती विसर्जनसाठी उतरले. नदीपात्रात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता ठोंबरे व प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले. बुडालेल्या दोघांनाही पोहता येत नव्हते.

घटनास्थळी भोसरी एमआयडीसी पोलीस, आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. त्यात प्रज्वल काळे याचा मृतदेह पाण्यात आढळून आला असून दत्ता ठोंबरेचा शोध सोमवारी उशिरापर्यंत सुरू होता.

Web Title: Both drowned in Indrayani during Ganesha's immersion