शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST2021-06-06T04:09:25+5:302021-06-06T04:09:25+5:30

हडपसरमधील काळेपडळ भागात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३ मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. ...

Both died in different accidents in the city | शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

हडपसरमधील काळेपडळ भागात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३ मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. चंदू सतन दिसले (वय ५६, रा. सातवनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. दुचाकीस्वार नीलेश पोळ (वय ३३, रा. हडपसर) आणि सहप्रवासी दिसले हडपसरमधील काळेपडळ परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. सहप्रवासी दिसले गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

पुणे-सोलापूर रस्त्यावर उरळी कांचन परिसरात मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. लता पांडुरंग दुधाळ (वय ४८, रा. शिवनगर, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पांडुरंग दुधाळ (वय ५३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

Web Title: Both died in different accidents in the city