निवडणुकीवरून पोंधवाडीत दोन्ह गुन्हे दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:49+5:302021-02-05T05:05:49+5:30

याबाबतची सविस्तर माहिती अशी: फिर्यादी विनोद बाजीराव भोसले यास तू माझे पॅनेलला मतदान करायचे, तू जर मतदान केले नाही ...

Both the crimes were reported in Pondhwadi from the election | निवडणुकीवरून पोंधवाडीत दोन्ह गुन्हे दखल

निवडणुकीवरून पोंधवाडीत दोन्ह गुन्हे दखल

याबाबतची सविस्तर माहिती अशी: फिर्यादी विनोद बाजीराव भोसले यास तू माझे पॅनेलला मतदान करायचे, तू जर मतदान केले नाही तर तुला माझ्या गावात राहू देणार नाही. तुझे अपहरण करून तुला जिवे मारून उजनीमध्ये टाकून देईन अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली आणि चारचाकी वाहनात बळजबरीने मदनवाडी येथील गुरांच्या गोठ्यात बांधून ठेवले. त्याप्रकरणी विराज वसंत बंडगर (वय २८ रा.मदनवाडी), गणेश दतात्रय पवार (वय ३५ रा. पवारवस्ती पोंधवडी), नारायण महादेव बंडगर (वय ३५), अभिषेक ज्ञानदेव बंडगर (वय २७), प्रदीप मधुकर बंडगर (वय ३२ रा. बंडगरवाडी पोंधवडी) यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी सुनील अप्पा पवार पोंधवडी यांनी माजी सरपंच नाना अर्जुन बंडगर, नवनाथ बंडगर, प्रेमकुमार बंडगर यांच्या विरोधात पोंधवडी येथील जमीन गट १०६ मध्ये शेतीची मशागत करीत असताना त्याला एकाने ही शेतजमीन आम्ही विकत घेतली आहे. या जमिनीमध्ये पाय ठेवायचा नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत तलवारची धाक दाखवत मारहाण केली. व सुनील पवार यांच्या बोटात असलेली अंगठी बळजबरीने काढून घेतल्याची तक्रार देण्यात आली आहे.

याप्रकरणी भिगवण पोलिसांनी ॲट्रॅासिटी तसेच आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तपास करीत आहे.

याप्रकरणी नाना अर्जुन बंडगर यांना अटक झाली असून, त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Both the crimes were reported in Pondhwadi from the election