ब्लॅकमेल करणाऱ्या दोघींना अटक

By Admin | Updated: May 25, 2015 05:55 IST2015-05-25T05:55:39+5:302015-05-25T05:55:39+5:30

ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोलकरणीसह दोघींना अटक केली आहे़

Both blackmailers arrested | ब्लॅकमेल करणाऱ्या दोघींना अटक

ब्लॅकमेल करणाऱ्या दोघींना अटक

हडपसर : ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोलकरणीसह दोघींना अटक केली आहे़
सुनीता संजयकुमार गायकवाड (वय ३४) व मोलकरीण प्रिया राजेंद्र पाटोळे (वय २०) अशी त्यांची नावे आहेत़ रामचंद्र गाडेकर (वय ६०, रा़ पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे़ ही घटना १५ मे रोजी दुपारी एक ते पावणेपाचच्या दरम्यान भेकराईनगर येथे घडली होती़
याप्रकरणी लताबाई रामचंद्र गाडेकर यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की या दोघींनी संगनमत करुन रामचंद्र गाडेकर यांना तुम्ही मोलकरणीचा हात धरून तिच्याशी असभ्य वर्तन केले आहे़ ही गोष्ट कोणाला माहिती होऊ नये, असे वाटत असेल तर, आम्हाला ५० हजार रुपये द्या अन्यथा आम्ही तुमची पोलिसांत तक्रार देऊन आणि समाजात बदनामी करू, अशी धमकी मोलकरणीला हाताशी धरून गायकवाड हिने दिली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने घाबरून गाडेकर यांनी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघींना अटक केली आहे़ अधिक तपासासाठी न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Both blackmailers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.