आसाम आणि मिझोराम सीमेवरील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:54+5:302021-07-28T04:10:54+5:30

पायाला लागली गोळी : वैभव निंबाळकर कछार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : आसाम आणि मिझोराम राज्यांमध्ये ...

On the border of Assam and Mizoram | आसाम आणि मिझोराम सीमेवरील

आसाम आणि मिझोराम सीमेवरील

पायाला लागली गोळी : वैभव निंबाळकर कछार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : आसाम आणि मिझोराम राज्यांमध्ये सोमवारी (दि. २६) रात्री झालेल्या सीमावादातुन गोळीबार झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात सणसर (ता. इंदापुर) चे भुमिपुत्र आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर पायाला गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सणसरचे सरपंच रणजितसिंह निंबाळकर यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करीत माहिती दिली. वैभव यांची बहिण अभिनेत्री उर्मिला निंबाळरक यांनी देखील समाज माध्यमांवर पोस्ट करीत या घटनेची माहिती दिली. आसाम आणि मिझोराम राज्यातील असलेल्या सीमावादातुन ही घटना घडली. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच पोलीसांचा मृत्यु झाला आहे. तर आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर हे सणसर (ता. इंदापुर) चे भुमिपुत्र आहेत. ते सध्या आसाम राज्यातील कछार जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. मिझोराम आसाम सीमेवर झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असुन ते लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना खासदार सुळे यांनी केली.

फोटो : वैभव निंबाळकर

२७०७२०२१ बारामती ०६

Web Title: On the border of Assam and Mizoram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.