शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 11:59 IST

गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देपरिसरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपमेवाणी आणि खालीद यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्षय गौतमराव बिक्कड (वय २२, रा. कर्वेनगर, मूळ रा. प्रकाशनगर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. ३१ डिसेंबरला जिग्नेश मेवाणी तसेच उमर खालीद यांची शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली. या माध्यमातून २ समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवी पेशवाई संपुष्टात आणणे हीच भीमा कोरेगाव येथील शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असे वक्तव्य खालीद तसेच मेवाणी यांना केले होते. यास प्रेरित होऊन काहींनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अमृत मराठे करीत आहेत.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीPuneपुणे