नववधू मोटारीच्या बोनेटवर; व्हिडीओ शूटिंग पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:39+5:302021-07-14T04:13:39+5:30
लोणी काळभोर : मास्क न वापरता नववधूला मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने व्हिडीओ शूटिंग करत प्रवास करणे महागात ...

नववधू मोटारीच्या बोनेटवर; व्हिडीओ शूटिंग पडले महागात
लोणी काळभोर : मास्क न वापरता नववधूला मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने व्हिडीओ शूटिंग करत प्रवास करणे महागात पडले. लोणी काळभोर पोलिसांनी वधूसमवेत चालक, व्हिडीओग्राफर तसेच गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार एस. एल. नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वधू शुभांगी शांताराम जरांडे (वय २३), मोटार चालक गणेश शामराव लवांडे (वय ३८, दोघे रा. सहकार कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे ) व व्हिडीओग्राफर तुकाराम सौदागर शेडगे (वय २३, रा. वाल्हेकरवाडी, आकुर्डी) आणि स्काॅर्पिओ गाडीमधील इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१३) शुभांगी हिचा विवाह सासवड (ता. पुरंदर) परिसरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या भरात वधू दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास करत होती. पोलिसानना हे कळताच सकाळी १०.३० सुमारास ते ितथे पोहचले. स्कार्पिओ गाडी (एमएच १२ बीपी ४६७८) च्या बोनेटवर शुभांगी शांताराम जरांडे ही बसली होती. इतर लोक गाडीत बसले होते. गणेश लवांडे हा ही णाडी चालवत होता. गाडीसमोर मोटार सायकल (एमएच १४ बीजी ५२५९) वर तुकाराम शेडगे हा व्हिडीओ शूटिंग करीत होता. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचा कॅमेरा जप्त केला आहे. नववधू, व्हिडीओग्राफर तसेच गाडीतील इतरांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड उपाययोजना कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
--------------------