हाडांची शस्त्रक्रिया होणार आणखी सोपी..!

By Admin | Updated: January 1, 2015 00:56 IST2015-01-01T00:56:46+5:302015-01-01T00:56:46+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी-प्राध्यापकांनी ही कमालदेखील साध्य करून दाखवली आहे. त्यामुळे आता हाडांची शस्त्रक्रिया अधिक सोपी व नेमकी होण्यास हातभार लागणार आहे.

Bone surgery will be easier ..! | हाडांची शस्त्रक्रिया होणार आणखी सोपी..!

हाडांची शस्त्रक्रिया होणार आणखी सोपी..!

राहुल शिंदे ल्ल पुणे
शरीराच्या आत असणाऱ्या नाजूक अवयवांचे रक्षण व्हावे म्हणून त्यावरती असतो हाडांचा पिंजरा. मात्र, हाडांची शस्त्रक्रिया होताना मात्र त्यात बसवले जाणारे स्क्रू, किती आत जातात आणि आतल्या नाजूक अवयवांना काही इजा तर होत नाही ना, हे पाहता यायला हवे. तंत्रज्ञानाच्या बळावर आणि संशोधनाच्या साहाय्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी-प्राध्यापकांनी ही कमालदेखील साध्य करून दाखवली आहे. त्यामुळे आता हाडांची शस्त्रक्रिया अधिक सोपी व नेमकी होण्यास हातभार लागणार आहे.
हाडांची शस्त्रक्रिया करताना एखादा स्क्रू हाडांमध्ये किती खोलवर बसवावा, याबाबत नेमकेपणाने सांगणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान सध्या अस्तित्वात नाही. परंतु, सध्याच्या तंत्रज्ञानाला पुरक असे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी केले आहे. तसेच त्याचे पेटंटही मिळवले आहे.त्यामुळे हाडांची शस्त्रक्रिया करणे अधिक सोपे व सुलभ होणार आहे.
तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी ‘थ्रीडी रिकन्स्ट्रकशन’ या विषयावर संशोधन केले आहे. होमोग्राफी व वॉक्सेलमॅपिंग या दोन पद्धतीचा वापर करून हायब्रिड रिकन्स्ट्रकशन तंत्रज्ञान या विद्यार्थ्यांनी शोधले आहे. एक्सरे इमेजेसचे थ्रीडी रिकन्स्ट्रकशन होत असल्यामुळे हाडांचा आकार किती आहे. तसेच हाडांच्या आतील नाजूक अवयव किती अंतरावर आहे. यासंदर्भातील माहिती या संशोधनामुळे डॉक्टरांना समजू लागली आहे. परिणामी, हाडांवरील शस्त्रक्रिया करताना येणाऱ्या विविध अडचणी यामुळे दूर होण्यास मदत झाली आहे. अनुभवी डॉक्टर कोणत्या हाडांमध्ये किती लांबी, रुंदीचा स्क्रू बसवावा याचा निर्णय अंदाज करून घेतात. परंतु, आता त्याला शास्त्रीय आधार मिळणार आहे. तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, की अनुजा फडके, तुषार जाधव या विद्यार्थ्यांनी डॉ. कुलबीर सिंग, डॉ. बी. पी. पाटील व माझ्या मार्गदर्शनाखाली थ्रीडी रिकन्स्ट्रक्शन या विषयावर संशोधन केले.

च्टोमोग्राफी मशिनच्या साह्याने हाडांचा फोटो काढला जातो. त्यामुळे संबंधित हाडाच्या आतील भाग किती अंतरावर आहे. मात्र, या संदर्भातील इमेज (थ्रीडी रेन्डर) डाऊनलोड होण्यासाठी सध्या ३० ते ४० सेकंद लागतात. परंतु,आता कमीत कमी कालावधीत ही इमेज डॉक्टरांना उपलब्ध करून देण्याबाबत पुढील संशोधन सुरू आहे.
च्पुण्यातील पिंपळे सौदागर परिसरातील डॉ. विश्वास नेने यांच्या रुग्णालयात यासंदर्भातील संशोधन पूर्ण
करण्यात आले. डॉ. नेने यांनीसुद्धा हे संशोधन
रुग्णांच्या व डॉक्टरांच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मत नोंदविले.

Web Title: Bone surgery will be easier ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.